spot_img
spot_img
spot_img
spot_img

डोणगावची ‘गुगल गर्ल’ चमकली! अवघ्या १० सेकंदात राज्यांची नावे सांगत कोमल खनपटेची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

बुलढाणा अपडेट प्रतिनिधी अनिल राठोड डोणगाव: बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत डोणगाव येथील कोमल देविदास खनपटे या विद्यार्थिनीने आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेच्या जोरावर ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये (IBR) स्थान मिळवले आहे. भारतातील सर्व राज्यांची नावे अवघ्या १० सेकंदांत सांगण्याचा थक्क करणारा विक्रम तिने प्रस्थापित केला असून, परिसरात तिची ओळख आता ‘गुगल गर्ल’ म्हणून निर्माण झाली आहे.कोमल ही डोणगाव येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत आहे. तिने लहानपणापासूनच सामान्य ज्ञानात रस दाखवत अफाट स्मरणशक्ती विकसित केली आहे. तिच्या या विक्रमी कामगिरीची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने तिला अधिकृत प्रमाणपत्र, मेडल ऑफ अचिव्हमेंट, आयबीआर पेन, बॅज आणि ओळखपत्र देऊन गौरविले आहे. या यशाचे श्रेय कोमलने तिचे वडील व पत्रकार देविदास खनपटे यांचे मार्गदर्शन आणि शाळेतील शिक्षकांना दिले आहे. ग्रामीण भागातील जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोमलने मिळवलेल्या या यशाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.

Related Articles

महावितरणचा भोंगळ कारभार! टंकलेखन परीक्षेत अंधार; विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

Buldhana update/ मेहकर | प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट संबंधित असलेल्या टंकलेखन (टायपिंग) परीक्षेत महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मोठा अडथळा निर्माण झाल्याची संतापजनक घटना आज (१० जुलै)...

चिमुकल्या राजची शेवटची रात्र ठरली काळरात्र; सर्पदंशाने अवघं गाव हळहळलं

काळजाचा थरकाप! वीज नसल्याने सर्पदंश ओळखण्यात चूक; आईच्या कुशीत झोपलेल्या ५ वर्षीय चिमुरड्याचा अंत बुलढाणा अपडेट / राजगड :  आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या पाच वर्षांच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!