spot_img
spot_img
spot_img
spot_img

डोणगावमध्ये रंगणार पैठणीचा खेळ! महिला दिनानिमित्त ‘होम मिनिस्टर’ सोहळ्याचे भव्य आयोजन.

बुलढाणा अपडेट / अनिल राठोड प्रतिनिधी डोणगाव जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुबोध युवक कल्याण मंडळ, विठ्ठल रुखमाई शिक्षण प्रसारक संस्था आणि सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्ट (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने डोणगाव येथे ‘होम मिनिस्टर: खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ८ मार्च रोजी विठ्ठल रुखमाई विद्यालयाच्या भव्य प्रांगणात हा सोहळा पार पडणार असून, यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी महिला बालकल्याण सभापती सौ. सायली सावजी यांनी केले आहे महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि मनोरंजनासाठी आयोजित या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक प्रा. संदीप देशमुख करणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना मानाची पैठणी आणि इतर आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. या आगळ्यावेगळ्या खेळात सहभागी होण्यासाठी महिला वर्गात मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज महिला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये लोणारच्या नगराध्यक्षा सौ. मिराताई मापारी, नगरसेविका श्रीमती निलीमा सोमन, सौ. रुपाली गारोळे, सौ. सुनिता ढाकरके, सौ. दिपीका राहाटे, ॲड. जयश्री राखुंडे, माजी सभापती श्रीमती वनिता खोडके, सरपंच सौ. किरण आखरे, सौ. वर्षा काळे, सौ. अश्विनी आखाडे, डॉ. ऋतुजा चव्हाण, माजी सरपंच श्रीमती कुसुम आखाडे, सौ. अनुराधा धांडे, डॉ. संगीता धाडकर, डॉ. प्रांजली बाजड, सामाजिक कार्यकर्त्या सौ. ज्योती बुरखंडे, सौ. मिना आढाव, इंजि. माधुरी फुले यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर महिला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. सायली शैलेश सावजी, डॉ. स्मृती सावजी, सौ. शितल इंगळे, सौ. प्रियंका सदार, सौ. मोहिनी सावजी, सौ. सविता आमले, सौ. सिंधु खोडके, सौ. साक्षी आंबेकर, सौ. आशा पांडव, सौ. वैशाली पळसकर, सौ. स्वाती आनकर यांसह महिला मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले असून, परिसरातील सर्व महिला भगिनींनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!