spot_img
spot_img
spot_img
spot_img

डोणगावमध्ये हायमास्ट दिवा कोसळला; मोठी दुर्घटना थोडक्यात टळली!

(बुलढाणा अपडेट) डोणगाव प्रतिनिधी – अनिल राठोड):

डोणगावातील ओलांडेश्वर मंदिराजवळील (आरेगाव रोड) हायमास्ट दिवा अचानक कोसळला. सुदैवाने हा खांब नाल्याच्या दिशेला पडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

अवघ्या २ वर्षात पोल गंजला: दीड-दोन वर्षांपूर्वीच बसवलेला हा लोखंडी खांब गंजल्यामुळे कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इतक्या कमी वेळात खांब गंजल्याने कामाच्या दर्जाबाबत संताप व्यक्त होत आहे.

भाविकांची वर्दळ असणाऱ्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 

गावातील इतर सर्व हायमास्ट खांबांची तात्काळ तपासणी करून धोकादायक खांब दुरुस्त करावेत, अन्यथा मोठ्या दुर्घटनेची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

Related Articles

महावितरणचा भोंगळ कारभार! टंकलेखन परीक्षेत अंधार; विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

Buldhana update/ मेहकर | प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट संबंधित असलेल्या टंकलेखन (टायपिंग) परीक्षेत महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मोठा अडथळा निर्माण झाल्याची संतापजनक घटना आज (१० जुलै)...

चिमुकल्या राजची शेवटची रात्र ठरली काळरात्र; सर्पदंशाने अवघं गाव हळहळलं

काळजाचा थरकाप! वीज नसल्याने सर्पदंश ओळखण्यात चूक; आईच्या कुशीत झोपलेल्या ५ वर्षीय चिमुरड्याचा अंत बुलढाणा अपडेट / राजगड :  आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या पाच वर्षांच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!