spot_img
spot_img
spot_img
spot_img

डोणगावच्या जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती साजरी; विद्यार्थ्यांच्या श्रमदानाने परिसर चकाचक

बुलढाणा अपडेट प्रतिनिधी अनिल राठोड

दि २३ फेब्रुवारी २०२६ डोणगाव: “स्वच्छता हीच ईश्वर सेवा” असा संदेश देणारे थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती आज स्थानिक जिल्हा परिषद मराठी शाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. केवळ प्रतिमा पूजनापुरते मर्यादित न राहता, शाळा आणि बाजार परिसराची प्रत्यक्ष साफसफाई करून विद्यार्थ्यांनी महाराजांना आगळीवेगळी मानवंदना दिली.

कार्यक्रमाची सुरुवात गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते. गाडगेबाबांनी आयुष्यभर समाजातील अज्ञान आणि घाण दूर करण्यासाठी जे कार्य केले, त्याचा वारसा जपण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

जयंतीचे औचित्य साधून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालप्रसादजी आखाडे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन श्रमदान केले. यावेळी शालेय परिसरासह लगतच्या बाजार परिसरातील कचरा वेचून परिसर पूर्णतः स्वच्छ करण्यात आला. “स्वच्छतेचे पुजारी असणाऱ्या गाडगेबाबांना कृतीतून दिलेली हीच खरी श्रद्धांजली आहे,” असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

परिसर स्वच्छ केल्यानंतर सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी ‘स्वच्छतेचा वसा कायम पुढे नेण्याची’ सामूहिक प्रतिज्ञा घेतली. गाडगेबाबांचे विचार केवळ भाषणातून मांडण्यापेक्षा ते प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, यामुळे परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली आहे.

Related Articles

महावितरणचा भोंगळ कारभार! टंकलेखन परीक्षेत अंधार; विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

Buldhana update/ मेहकर | प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट संबंधित असलेल्या टंकलेखन (टायपिंग) परीक्षेत महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मोठा अडथळा निर्माण झाल्याची संतापजनक घटना आज (१० जुलै)...

चिमुकल्या राजची शेवटची रात्र ठरली काळरात्र; सर्पदंशाने अवघं गाव हळहळलं

काळजाचा थरकाप! वीज नसल्याने सर्पदंश ओळखण्यात चूक; आईच्या कुशीत झोपलेल्या ५ वर्षीय चिमुरड्याचा अंत बुलढाणा अपडेट / राजगड :  आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या पाच वर्षांच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!