spot_img
spot_img
spot_img
spot_img

चिखला येथील घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी गृहमंत्री यांना डोणगाव पोलिसांच्या मार्फत निवेदन 

बुलढाणा अपडेट/डोणगाव : बुलडाणा जिल्हा अंतर्गत लोणार तालुक्यातील चिखला येथे शिवस्मारकावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादातून महिलांवर अमानुष मारहाण झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल शिवप्रेमी समाज यांच्या वतीने डोणगाव शहर २२ फेब्रुवारी रोजी कडकडीत बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. २० फेब्रुवारी २०२६ रोजी चिखला येथे शिवस्मारकावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. या घटनेत मराठा समाजातील शिवकन्या संजीवनीताई वाघ तसेच इतर महिलांना मारहाण करण्यात आली. महिलांच्या अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा निषेध करत संबंधित मुख्य आरोपी व सहआरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस प्रशासनामार्फत देण्यात आले आहे.भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत तसेच समाजात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ २२ फेब्रुवारी रोजी डोणगाव शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय सकल शिवप्रेमी समाजाने घेतला असून नागरिकांनी बंदला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

महावितरणचा भोंगळ कारभार! टंकलेखन परीक्षेत अंधार; विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

Buldhana update/ मेहकर | प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट संबंधित असलेल्या टंकलेखन (टायपिंग) परीक्षेत महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मोठा अडथळा निर्माण झाल्याची संतापजनक घटना आज (१० जुलै)...

चिमुकल्या राजची शेवटची रात्र ठरली काळरात्र; सर्पदंशाने अवघं गाव हळहळलं

काळजाचा थरकाप! वीज नसल्याने सर्पदंश ओळखण्यात चूक; आईच्या कुशीत झोपलेल्या ५ वर्षीय चिमुरड्याचा अंत बुलढाणा अपडेट / राजगड :  आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या पाच वर्षांच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!