spot_img
spot_img
spot_img
spot_img

“युवकांच्या अडचणी सोडवणे हेच आमचं कर्तव्य!” — डोणगावात ऋषीभाऊ जाधवांचा ठाम शब्द

डोणगाव येथे युवासेनेचा गावभेट दौरा अत्यंत उत्साहात आणि जोशपूर्ण वातावरणात पार पडला.

“गाव तिथे शाखा, घर तिथे युवा शिवसैनिक” या संकल्पनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या या दौऱ्याला युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख मा. श्री. ऋषीभाऊ जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या गावभेट दौऱ्यात ऋषीभाऊ जाधव यांनी गावातील ज्येष्ठ व युवा मंडळींसोबत मनमोकळेपणाने संवाद साधत युवकांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या.

यावेळी त्यांनी युवकांना ठाम शब्द देत सांगितले की,

“युवकांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्या पूर्ण करणे हेच आमचं परम कर्तव्य आहे!”

या दौऱ्यामुळे डोणगावात युवासेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून आले.

कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, युवकांच्या प्रश्नांवर ठोस आणि प्रभावी पावले उचलण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी शिवसेना-युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील ज्येष्ठ व युवा मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

महावितरणचा भोंगळ कारभार! टंकलेखन परीक्षेत अंधार; विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

Buldhana update/ मेहकर | प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट संबंधित असलेल्या टंकलेखन (टायपिंग) परीक्षेत महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मोठा अडथळा निर्माण झाल्याची संतापजनक घटना आज (१० जुलै)...

चिमुकल्या राजची शेवटची रात्र ठरली काळरात्र; सर्पदंशाने अवघं गाव हळहळलं

काळजाचा थरकाप! वीज नसल्याने सर्पदंश ओळखण्यात चूक; आईच्या कुशीत झोपलेल्या ५ वर्षीय चिमुरड्याचा अंत बुलढाणा अपडेट / राजगड :  आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या पाच वर्षांच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!