spot_img
spot_img
spot_img
spot_img

जन्मदिनी बॅनरबाजीला फाटा, जनहिताला प्राधान्य! — मा.कृषी सभापती राजेंद्र पळसकर यांचा समाजाला आदर्श संदेश

Oplus_16777218

डोणगाव येथे दोन दिवसीय निशुल्क आरोग्य चाचणी शिबिराचे आयोजन करून सर्वसामान्य जनतेसाठी मोठा दिलासा देण्यात आला. या शिबिरात सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या, आवश्यक औषधोपचार, नेत्र तपासणी तसेच चष्मेवाटप करण्यात आले. ग्रामीण व गरजू नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.

याचबरोबर डोणगाव बस स्थानकाजवळील अनेक वर्षांपासून बंद असलेले मुतारीघर पुन्हा जनतेसाठी खुले करण्यात आले. जन्मदिवसाच्या बॅनरबाजीवर होणारा अनावश्यक खर्च टाळत स्वखर्चातून मुतारीघराची संपूर्ण दुरुस्ती, साचलेली घाण साफसफाई, तसेच लोखंडी पूल उभारून ते सार्वजनिक वापरासाठी खुले करण्यात आले.

“श्रीमंत तर अनेक झाले, पण दातृत्वाची क्षमता फार थोड्यांकडे असते,” हे शब्द आज राजेंद्र पळसकर यांनी कृतीतून सिद्ध करून दाखवले. जन्मदिनी स्वतःवर खर्च न करता गोरगरीब जनतेच्या उपयोगी पडणाऱ्या कामांवर खर्च करावा, असा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला आहे.

हा उपक्रम म्हणजे लोकसेवेची खरी ओळख असून, अशा सामाजिक बांधिलकीतूनच लोकप्रतिनिधी जनतेच्या हृदयात स्थान मिळवतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले

Related Articles

डोणगावचा चिमुकला देशपातळीवर चमकला : इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव!

डोणगाव (बुलढाणा अपडेट / सुबोध आखाडे) :– बुद्धिमत्ता व स्मरणशक्तीच्या जोरावर अवघ्या २ वर्षे ८ महिने वयात डोणगावच्या चिमुकल्याने देशपातळीवर जिल्ह्याचे नाव उज्वल केले...

जिल्हाधिकाऱ्याकडे पांदण रस्त्याची मागणी – शैलेश सुबोध सावजी

डोणगाव , परिसरातील डोणगाव–शेलगाव रस्त्याच्या उर्वरित तीन किलोमीटर कामाला मुख्यमंत्री बळीराजा पांढण रस्ता योजनेअंतर्गत तातडीने मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी मागणी बुलढाणा...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!