spot_img
spot_img
spot_img
spot_img

डोणगाव मध्ये पांढऱ्या तांदुळाचा काळाबाजार

    https://chat.whatsapp.com/KNTitp15G8M2BgVDPl32Aw?mode=wwt

डोणगाव परिसरात पांढऱ्या तांदळाच्या काळाबाजाराने अक्षरशः उच्छाद मांडला असून भर दिवसा तांदळाच्या गाड्या खुले आम फिरताना दिसत आहेत. शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेकडून चिल्लर भावात तांदूळ उचलून पुढे बेभाव विक्री करणाऱ्या तांदूळ माफियांचे सुळसुळाट झाला आहे. गावात उघड उघड सुरू असलेल्या या गैरव्यवहाराकडे पुरवठा विभाग आणि पोलिस यांचे डोळे का बंद आहेत? हा इतका मोठा काळाबाजार नजरेआड कसा राहतो? आणि यामागे कोणाचे हात आहे अशी चर्चा रंगत आहे? असे तिखट प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये जोरदार गाजत आहेत. गरीबांच्या हक्काचे अन्न काळ्या बाजारात पोहोचत असताना संबंधित यंत्रणा निष्काळजीपणा का दाखवत आहे, याबाबत जनतेत प्रचंड संताप पसरला आहे. प्रशासनाने तात्काळ हालचाल करून या तांदूळ माफियांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जन आक्रोश उफाळण्याची पूर्ण शक्यता असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Related Articles

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन ?

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana update / सिंदखेडराजा : देऊळगाव राजा...

चोरट्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी केली लंपास

Buldhana update / मलकापूर : शहरातील दीपकनगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!