spot_img
spot_img
spot_img
spot_img

शतकांची अद्वितीय प्रतिरूप परंपरा

डोणगाव येथून जवळच असलेले ग्राम मादनी हे गाव श्रद्धा, इतिहास आणि आध्यात्मिक उर्जेचा संगम म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे, केंद्रीय आयुष मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांचे हे मूळ गाव असल्याने या परंपरेचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.गावातील प्राचीन माढेश्वरी देवीचे जागृत ठाणे पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. याच देवीच्या नावावरून ‘मादनी’ हे नाव पडल्याचे सांगितले जाते. गावाची ओळखच देवीच्या अधिष्ठानाशी जोडलेली आहे.ही अद्वितीय परंपरा अंदाजे १०० ते १२५ वर्षांपूर्वी महादजी मेटांगळे यांनी सुरू केल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून होळीच्या दिवशी देवीचे “प्रतिरूप” साकारण्याची परंपरा अखंड सुरू आहे.नवरात्र नव्हे… होळीचे नऊ दिवस महत्त्वाचेमादनीची सर्वात वेगळी आणि प्रभावी परंपरा म्हणजे होळीच्या नऊ दिवस आधीपासून संपूर्ण गाव उपास धरतो.नवरात्रीत कोणी उपास धरेल किंवा न धरेल; पण होळीच्या आधीचे नऊ दिवस मात्र गाव एकसंघपणे नियम पाळतो.विशेष म्हणजे, जे भाविक देवीचे प्रतिरूप धारण करतात ते नऊ दिवस ‘निरंकार उपास’ अनिवार्यपणे धरतात.हा उपास केवळ धार्मिक नसून त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोनही आहे शरीरशुद्धीकरण, मानसिक एकाग्रता आणि आत्मसंयम यासाठी हा उपवास केला जातो.मन, शरीर आणि श्रद्धा तिन्हींची शुद्धी करूनच देवीचे रूप धारण केले जाते.लक्ष्मण मेटांगळे(देवकर) यांच्या पूर्वजांनी देवीचे सत्व येथे आणून प्राणप्रतिष्ठा केल्याची सांगितले जाते त्यामुळेपरंपरेने पहिले मानाचे प्रतिरूप लक्ष्मण मेटांगळे (देवकर) महाराजांकडे दिले जाते.होळी पेटल्यानंतर मध्यरात्री बारा वाजता प्रतिरूप नियोजित स्थळावरून निघते.दोन खांदेकरी आणि एक सेवेकरी यांच्या सोबत देवीचे प्रतिरूप माढेश्वरी मंदिराकडे प्रस्थान करते. पंचक्रोशीतील हजारो भाविक या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहतात.मंदिरासमोर आल्यानंतर श्रद्धाळूंच्या भावनेनुसार देवी त्या प्रतिरूपात समावते, असा दैवी अनुभव घेतला जातो.यानंतर काळया कपड्यातील ढाल आणि कट्यार घेऊन असलेल्या दैत्यासोबत प्रतीकात्मक कट्यार युद्ध साकारले जाते. हे दृश्य केवळ नाट्य नसते ते श्रद्धा आणि शक्तीचे प्रतीक असते.काही वर्षी सात, तर काही वर्षी दहा प्रतिरूपे निघतात. ही संख्या नवसावर अवलंबून असते.देवीसमोर आरसा दाखवून पुनः मूळ स्वरूप स्वीकारले जाते.यानंतर संपूर्ण गावातून प्रदक्षिणा काढली जाते.दुसऱ्या दिवशी सकाळी प्रत्येक घरातून देवीला नैवेद्य अर्पण केला जातो. संपूर्ण गावात रोषणाई, भक्ती आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण होते.माढेश्वरी देवीवर सर्व जाती-धर्मीय नागरिकांचा अढळ विश्वास आहे. नवस करणारे विविध समाजघटकांतील भाविक असतात. ही परंपरा सामाजिक ऐक्याचे जिवंत उदाहरण आहे.या भव्य आणि हजारोंच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्याचे नियोजन वर्षानुवर्षे शांततेत आणि शिस्तीत पार पाडण्याची जबाबदारी माजी सरपंच मारोतराव मेटांगळे व समस्त गावकरी मंडळी यांनी समर्थपणे सांभाळली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम चोख बंदोबस्तात आणि सामाजिक सलोख्याने पार पडतो.श्रद्धा, शिस्त आणि शक्तीचे प्रतीक केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचे मूळ गाव असलेले मादनी हे केवळ राजकीय ओळखीमुळे नव्हे, तर या अद्वितीय आध्यात्मिक परंपरेमुळे विशेष ठरते.होळीच्या रात्री येथे केवळ उत्सव साजरा होत नाही तर श्रद्धा, विज्ञान, शिस्त, संयम आणि सामाजिक ऐक्य यांचा संगम अनुभवायला मिळतो.मादनीची होळी म्हणजे भक्तीची पराकाष्ठा,उपासाची शुद्धता,आणि देवीच्या प्रतिरूपात प्रकट होणारी दिव्य शक्ती!

Related Articles

रोजा सोडण्याच्या काही क्षण आधीच काळाचा घाला; शेलगाव देशमुख येथे विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

(बु.अ.प्र.) डोणगाव (अनिल राठोड): मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ६ मार्च रोजी सायंकाळी रोजा सोडण्याची तयारी सुरू असतानाच, एका...

काळाचा घाला: एका जीवघेण्या अपघातातून सावरले, पण दुसऱ्या अपघाताने शरद जाधव यांचा घेतला बळी

बुलढाणा अपडेट प्रतिनिधी अनिल राठोड डोणगाव एका जीवघेण्या अपघातातून बचावल्यानंतर काही दिवसांतच दुसऱ्या भीषण अपघाताने एका व्यक्तीचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना डोणगाव परिसरात घडली...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!