spot_img
spot_img
spot_img
spot_img

डोणगाव ग्रामपंचायत चे दोन कर्मचारी बडतर्फ. ग्रामपंचायत अधिकारी यांच्या वर कारवाईची टांगती तलवार.

डोणगाव ग्रामपंचायतीमध्ये मनमानी व गलथान कारभार करणे दोन कर्मचाऱ्यांच्या अंगलट आले आहे. या लिपिकांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असलीतरी जिल्हा परिषद प्रशासन कारवाई करीत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराला जनता पुरती वैतागली असून, समस्यांचा मोठा डोंगरच ग्रामस्थांच्या पुढे उभा आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने ॲक्शन मोडवर येऊन दोषी ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर कारवाई केल्यास ग्रामपंचायत कारभारात सुधार येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.डोणगाव ग्रामपंचायत आणि तेथे चालणारा कारभार नेहमी चर्चेत राहतो. मागील कित्येक वेळी ग्रामपंचायत अधिकारी निलंबित होताना पाहिल्या गेले. यावेळी मात्र ग्रामपंचायतचे दोन लिपिक बडतर्फ केल्या गेले. डोणगाव ग्रामपंचायत कारवाई करू शकते.मात्र, दोष सिद्ध झालेले असतानासुद्धा जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासन कारवाई का करू शकत नाहीत, असा सवाल केला जात आहे. डोणगाव येथील ग्रामपंचायतमधील कारभाराची चौकशी करून कार्यवाही करण्यासंदर्भात अमोल धोटे यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. चौकशी अहवाल ३० जानेवारी रोजी प्राप्त झाला.डोणगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी व्ही.के. दांडगे यांच्याविरुद्ध चौकशी अहवालामध्ये गंभीर बाबी आढळून आल्या. जिल्हा परिषद सेवा १९६४ च्या नियम (३) नुसार कार्यवाही करण्यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश दिले. मात्र पुढे कारवाई झाली नव्हती.विशेष म्हणजे अमोल धोटे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले होते की, सामान्य निधी रोकड वही, प्रत्येक दिवसी वसुल झालेली रक्कम ग्रामनिधीत जमा न करता परस्पर खर्च करण्यात आली. ८८,२५५ रुपये इतकी रक्कम नियमबाह्य खर्च झाल्याबाबत तसेच एक बँक खाते असणे बंधनकारक असताना अनेक बँक खाते काढण्यात आले. तीन वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे ठेवणेबाबत, नमुना नंबर ५ नोंदीमध्ये गंभीर त्रुटी असणे, रोकड वहीवर स्वाक्षरीतील बदल, २० ऑगष्ट २०२५ ते २४ ऑगस्ट २०२५ रोजीच्या नोंदीबाबत नियमानुसार केली नसल्याबाबत, १५ व्या वित्त आयोग मानधन खर्चातील अनियमितता त्याबाबत जबाबदारी निश्चीत करावी, नमुना ५ मधील नोंदी १८ जुलै २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीच्या नोंदी असून इतर कालावधीतील नोंदी घेण्यात आल्या नाही, नमुना ७ व ५ मधील रकमेतील तफावत असून ८१,३४२ रुपये व ३६४९६ रुपये इतक्या रकमेच्या नोंदी नाहीत, नुमना ५ वर शिक्के मारलेले असून सचिवांची अधिकृत स्वाक्षरी नाही, रोकड वही अपूर्ण ठेवणे या मुद्यावर चौकशी झाली होती. ज्या चौकशीमध्ये ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले होते. असे असताना डोणगाव १८ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्या आदेशाने ग्रामपंचायत लिपिक श्याम खोटे व प्रदीप परमाळे यांना बडतर्फ करण्यात आले. ज्यात सांगण्यात आले होते की २०२३-२४ चे लेखा परीक्षणमध्ये १ लाख १० हजार ४२ रुपये वसुली पात्र रक्कम ग्रामपंचायत खात्यात न जमा करता परस्पर खर्च केल्याप्रकरणी व ग्रामपंचायत कामकाज नियमानुसार न करणे तसेच अमोल धोटे यांची तक्रार अशा कारणाने ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांनी श्याम खोटे व प्रदीप परमाळे या दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले. एकीकडे डोणगाव ग्रामपंचायतने तत्परता दाखवत अनियमितता करणाऱ्या दोन ग्रामपंचायत लिपिकांना बडतर्फ केले. मात्र जिल्हा पातळीच्या चौकशी समितीने दोषी ठरवलेल्या ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न होणे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर बडतर्फची कारवाई होणे तर सर्व दोष सिद्ध होऊन देखील ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर कारवाई न होणे, याविषयी ग्रामस्थांमध्ये चर्चा रंगली आहे.(याबाबत सदर कर्मचारी यांना विचारले असता आम्ही या अन्यायाविरोधात वरीष्ठ व न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले)


 

Related Articles

रोजा सोडण्याच्या काही क्षण आधीच काळाचा घाला; शेलगाव देशमुख येथे विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

(बु.अ.प्र.) डोणगाव (अनिल राठोड): मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ६ मार्च रोजी सायंकाळी रोजा सोडण्याची तयारी सुरू असतानाच, एका...

काळाचा घाला: एका जीवघेण्या अपघातातून सावरले, पण दुसऱ्या अपघाताने शरद जाधव यांचा घेतला बळी

बुलढाणा अपडेट प्रतिनिधी अनिल राठोड डोणगाव एका जीवघेण्या अपघातातून बचावल्यानंतर काही दिवसांतच दुसऱ्या भीषण अपघाताने एका व्यक्तीचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना डोणगाव परिसरात घडली...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!