spot_img
spot_img
spot_img
spot_img

बापाविरोधात धोरणे राबवणाऱ्यांच्या पाठीमागे फिरणे सोडावे – शिवव्याख्याते पांडुरंग पाटील

शेतकऱ्याच्या पोरांनी शिवचरित्रातून शेती विषयक धोरणांचा आदर्श घ्यावा

बापाविरोधात धोरणे राबवणाऱ्यांच्या पाठीमागे फिरणे सोडावे – शिवव्याख्याते पांडुरंग पाटील

 

मेहकर तालुक्यातील नांद्रा या गावी व्याख्यानाच्या कार्यक्रमातून प्रबोधनात्मक शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने सुप्रसिद्ध शिवव्याख्याते तथा जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड बुलढाणा पांडुरंग पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शिवचरित्रावर प्रकाश टाकताना पाटील यांनी सांगितले की, आज पासून चारशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा जो राज्यकारभार बघितला त्याच्या धोरणाच्या केंद्रस्थानी कायम घेतला शेतकरी कष्टकरी शेतमजूर व सर्वसामान्य ठेवला होता. प्रसंगी अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना शेतीपूरक अवजारे ,जनावरे, गहू-दाळताना, बी बियाणे आणि ज्यांच्याकडे जमीन नाही अशांना जमीन सुद्धा कसण्यासाठी उपलब्ध करवून इथला शेतकरी व सर्वसामान्य सुखी व समृद्ध कसा होईल हे कायमस्वरूपी बघितलं. मोहिमेवर जातानाही आपल्या आरमाराला शिवरायांच्या सक्तीच्या ताकीद असायच्या की शेतकऱ्याचे उभ्या पिकाचे कुठेही नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. परंतु आज इतकी शतके उलटूनही आजचे राज्यकर्ते एकीकडे शेतकऱ्यांच्या विरोधी धोरणे राबवतात व दुसरीकडे आमच्या शेतकरी व सर्वसामान्यांच्या पोरांना केवळ नाचगाणे व उत्सव करण्यात गुंतवून ठेवतात. अशावेळी असे प्रबोधनाचे जयंती उत्सव खूप मोलाचे ठरतात असे मत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच आज जर शिवराय जिवंत असते तर आज ज्यांनी अमेरिकेसोबत शेतकरी विरोधी आयात निर्यातीचा करार करणाऱ्यांच्या गर्दन छाटल्या असत्या.तेव्हा आता शेतकऱ्याच्या पोरांनी सत्यता ओळखली पाहिजे व शिवरायांच्या चरित्रातून आदर्श घेऊन शेतकरी बापा विरोधात धोरणे राबवणाऱ्या दुटप्पी राजकारण्यांचे फुकटचे भांडवल बनणे सोडायला हवे असेही पाटील म्हणाले.

मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र पवार यांनीही अंधश्रद्धा तर प्रा दीपक पाचरणे यांनी वृक्ष बीज संकलन व माजी गटविकास अधिकारी गजानन पाटोळे यांनी आजची समाज रचना यावर आपले विचार व्यक्त केले.सदर कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे सुनील वाघमारे,भागवत दिगडे, युवा नेते जितू अडेलकर, सरपंच कडूबा वैराळ, उपसरपंच गजानन बाजड, लेखक विकास सुखदाने, श्री भगवान सोनसळे, कपिल वैराळ,ऋषिकेश वाघमारे,ऋषिकेश वैराळ आदींसहित परिसरातील अनेक गणमान्य व्यक्ती तसेच बहुसंख्येने महिला व पुरुष ग्रामस्थांची उपस्थिती अगदी शेवटपर्यंत होती हे विशेष.

Related Articles

महावितरणचा भोंगळ कारभार! टंकलेखन परीक्षेत अंधार; विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

Buldhana update/ मेहकर | प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट संबंधित असलेल्या टंकलेखन (टायपिंग) परीक्षेत महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मोठा अडथळा निर्माण झाल्याची संतापजनक घटना आज (१० जुलै)...

चिमुकल्या राजची शेवटची रात्र ठरली काळरात्र; सर्पदंशाने अवघं गाव हळहळलं

काळजाचा थरकाप! वीज नसल्याने सर्पदंश ओळखण्यात चूक; आईच्या कुशीत झोपलेल्या ५ वर्षीय चिमुरड्याचा अंत बुलढाणा अपडेट / राजगड :  आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या पाच वर्षांच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!