बुलढाणा अपडेट 20 फेब्रुवारी: डोणगाव हे राज्य महामार्गोवर असणारे गाव असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जवळपास २७ खेडे जोडलेले आहेत एवढेच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील रूग्ण ही दररोज येथे तपासणी साठी येत असतात. या प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वात जास्त कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्या जातात अशा या प्राथमिक आरोग्य केंद्रास यावर्षी राज्यस्तरीय HMIS माहीती वरुन उत्कृष्ट सेवा देणारे आरोग्य सेवा केंद्र असल्याबद्दल या प्राथमिक आरोग्य केंद्राला यावर्षी चा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार मिळाला असून या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राम गायकवाड व कर्मचारी हे महाआरोगय सन्मान पुरस्कारासाठी पात्र ठरले आहे.प्रत्येक जिल्ह्यातून एका प्राथमिक आरोग्य केंद्राची HMIS माहीती वरुन उत्कृष्ट सेवा देणारे आरोग्य केंद्र निवडले जाते यावर्षी डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला हा सन्मान मिळाला आहे असे पत्र डॉ. सरीता हजारे सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी बुलढाणा यांना दिले आहे. या निवडीबद्दल डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा चे वैद्यकीय अधिकारी डॉ राम गायकवाड व कर्मचारी यांचे उत्कृष्ट आरोग्य सेवा देत आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगाव येथे आतापर्यंत 146 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया या यशस्वीपणे पार पडल्या असून सादर केसेसचा आकडा हा तालुक्यामध्ये सर्वात जास्त असून सन 2024-25 मध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचा आकडा हा 236 तेवढ्या शस्त्रक्रिया प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगाव येथे यशस्वीरित्या पार पडल्या असून तसेच १८ फेब्रुवारी रोजी रोजी HMIS प्रणाली मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगाव हे बुलढाणा जिल्ह्यामधून प्रथम आल्यामुळे त्यांना पुरस्कारा करता मुंबई येथे आमंत्रण दिले आहे





