बुलडाणा अपडेट/वाशीम प्रतिनिधी : शिवजयंती निमित्त तालुक्यातील हिस्से बोराळा येथे २० फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध व्याख्याते राकेश पिंजण यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जात असतात त्याचप्रमाणे यावर्षी शिवजंजयंती निमित्त प्रसिद्ध व्याख्याते राकेश पिंजण यांच्या व्याख्यानाचे आयोजन गावकऱ्यांच्या व शिवजंती उत्सव समिती हिस्से बोराळा यांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर व्याख्यान शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता वाशीम तालुक्यातील हिस्से बोराळा येथील संत गजानन महाराज प्रांगणात होणार आहे. यावेळी व्याख्याते राकेश पिंजण हे छत्रपती शिवरायांच्या जीवनावर प्रकाश टाकणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व त्यांचे विचार मांडणार आहे,तरी ग्रामस्थ व सार्वजनिक शिवजंजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने परिसरातील शिवप्रेमी यांच्यासह कुटुंबातील प्रत्येकाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.





