बुलढाणा अपडेट/देऊळगाव साखरशा (प्रतिनिधी):- येथे बंजारा समाजाचे दैवत संत श्री. सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते संत श्री.सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन सर्वश्री रामदास महाराज चव्हाण, मोहनराव राठोड, मधुकर चव्हाण, मागीलाल राठोड, ठाणेदार आजीनाथ मोरे, प्रमोदबापू देशमुख,ॲड. शैलेश गायकवाड,बी.एम.राठोड, रणजितबापू देशमुख, बाळू वानखडे, रमेश आमले, रमेश बाजड, अरुण गायकवाड, दिलीपराव नवत्रे, दशरथ गायकवाड,गजानन पाटील, सुनिल पाटील, पुरुषोत्तम चवरे, महादेव धानोरे, निसारभाई कुरेशी, हमिद मिर्झा, सुरेश आमले, विपुल देशमुख, गोपाल राठोड, रामचंद्र चव्हाण, गौरव देशमुख, नवल राठोड, दिलिप वानखडे यांचेसह अनेकांनी पूजन केले.
यावेळी रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. यामध्ये सर्वश्री कवीश्वर राठोड,प्रभू चव्हाण,रामचंद्र चव्हाण,दिलीप राठोड,शिवानंद पवार,योगेश आल्हाट,अजय राठोड,अविनाश नवत्रे ,गोपाल चव्हाण,सूरज चव्हाण,अंकुश राठोड,करण पवार,किशोर राठोड,ऋषिकेश राठोड,योगेश चव्हाण,पंजाब राठोड,अविनाश चव्हाण,योगेश चव्हाण,संतोष पवार,शे.अहमद कासार,सागर राठोड,गोपाल सोळंके , गोपाल काळे,चेतन राठोड,रणजीत चव्हाण,विठ्ठल चव्हाण,अँड शैलेश गायकवाड,ओम सोनूने,सुभाष राठोड,गोपाल सुर्वे,अनिल चव्हाण,मिलिंद राठोड,प्रताप चव्हाण,वासुदेव जाधव,भगवान जाधव,लखन आडे, ज्ञानेश्वर राठोड ,प्रसन्न गायकवाड,कमल राठोड,किशोर चव्हाण, नितेश पवार,चेतन राठोड,मंगल पवार,सचिन राठोड,सेवक पवार यांनी रक्तदान केले. संत सेवालाल महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. महिला व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ग्रामपंचायत समोरील प्रांगणात असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांना मान्यवरांच्या हस्ते पूजन करून हारार्पण करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदीश चव्हाण, सुनिल राठोड, कैलास चव्हाण, प्रदीप राठोड, कृष्णा चव्हाण, विठ्ठल राठोड,अनुराग जाधव, गोपाल राठोड, सुखदेव पवार, यांच्यासह अनेक समाज बांधवांनी परिश्रम घेतले.





