spot_img
spot_img
spot_img
spot_img

डोणगावमध्ये रात्रीचा थरार! हॉटेल चालिकेचा विनयभंग करून आरोपी फरार

डोणगाव (जि. बुलढाणा): समृद्धी महामार्गालगत हॉटेल चालविणाऱ्या एका ४७ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री घडली. या प्रकरणी डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये लक्ष्मण सोमटकर (वय ३५, रा. डोणगाव) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला डोणगाव येथील समृद्धी महामार्गाशेजारी एका पेट्रोल पंपासमोर हॉटेल चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. १५ फेब्रुवारी रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास महिला हॉटेलवर एकटी असताना आरोपी तेथे आला. त्याने महिलेकडे दारूची मागणी केली. मात्र महिलेने “आम्ही दारू विक्री करत नाही” असे सांगितले.

याचा राग आल्याने आरोपीने पीडितेचा हात धरून तिला ओढले. झटापटीत महिला खाली पडली, त्यामुळे तिच्या पाठीला दुखापत झाली. त्यानंतरही आरोपीने अश्लील वर्तन करत महिलेच्या लज्जेला बाधा येईल असे कृत्य केले. तसेच शिवीगाळ करत आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

घटनेनंतर पीडितेने आपल्या पतीला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर रात्रीच डोणगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ७४ (विनयभंग), ११५(२) (स्वेच्छेने दुखापत करणे), ३५२ (अपमान करणे) तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका संजय घिके करीत असून, ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Related Articles

रोजा सोडण्याच्या काही क्षण आधीच काळाचा घाला; शेलगाव देशमुख येथे विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

(बु.अ.प्र.) डोणगाव (अनिल राठोड): मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ६ मार्च रोजी सायंकाळी रोजा सोडण्याची तयारी सुरू असतानाच, एका...

काळाचा घाला: एका जीवघेण्या अपघातातून सावरले, पण दुसऱ्या अपघाताने शरद जाधव यांचा घेतला बळी

बुलढाणा अपडेट प्रतिनिधी अनिल राठोड डोणगाव एका जीवघेण्या अपघातातून बचावल्यानंतर काही दिवसांतच दुसऱ्या भीषण अपघाताने एका व्यक्तीचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना डोणगाव परिसरात घडली...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!