spot_img
spot_img
spot_img
spot_img

डोणगाव पत्रकार संघाकडून तहसीलदार प्रतिक्षाताई तेजनकर यांचा सन्मानपूर्वक गौरव

  1. (जिल्हा प्रतिनिधी ॲड जैनुल शेख) डोणगाव : रिसोड येथील तहसीलदार प्रतिक्षाताई तेजनकर यांना स्व. चतुराबाई स. पळसकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘राजमाता माँ जिजाऊ पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल, डोणगाव पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.दि. १ फेब्रुवारी रोजी तहसीलदार प्रतिक्षाताई तेजनकर व रिसोडचे ठाणेदार संतोष अघाव हे डोणगाव येथे भेटीस आले असता, पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रशासकीय कामकाजातील तत्परता, निर्णयक्षमता आणि जनसामान्यांच्या प्रश्नांबाबत असलेली संवेदनशीलता याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आल्याने सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.या सत्कारप्रसंगी डोणगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन गाभणे, उपाध्यक्ष ॲड. जैनुल आबेद्दीन शेख, सचिव सुबोध आखाडे तसेच मार्गदर्शक अशोकराव वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पत्रकार संघाचे सदस्य जमील पठाण, आवेज पठाण, अनिल राठोड, गणेश लहाने, राजेश वाघमारे, सुरेश फिसके, देविदास खनपटे यांच्यासह माजी कृषी सभापती राजेंद्र पळसकर, तसेच ‘सकाळ’चे प्रतिनिधी राम लहाने व इतर पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रशासकीय कामकाजात कार्यक्षमता, पारदर्शकता आणि लोकाभिमुख दृष्टिकोन ठेवून कार्य करणाऱ्या तहसीलदार प्रतिक्षाताई तेजनकर यांचा हा सत्कार म्हणजे त्यांच्या कार्याची पत्रकारितेच्या माध्यमातून दिलेली सन्मानाची पावती असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Related Articles

रोजा सोडण्याच्या काही क्षण आधीच काळाचा घाला; शेलगाव देशमुख येथे विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

(बु.अ.प्र.) डोणगाव (अनिल राठोड): मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ६ मार्च रोजी सायंकाळी रोजा सोडण्याची तयारी सुरू असतानाच, एका...

काळाचा घाला: एका जीवघेण्या अपघातातून सावरले, पण दुसऱ्या अपघाताने शरद जाधव यांचा घेतला बळी

बुलढाणा अपडेट प्रतिनिधी अनिल राठोड डोणगाव एका जीवघेण्या अपघातातून बचावल्यानंतर काही दिवसांतच दुसऱ्या भीषण अपघाताने एका व्यक्तीचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना डोणगाव परिसरात घडली...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!