spot_img
spot_img
spot_img
spot_img

डोणगावचा चिमुकला देशपातळीवर चमकला : इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव!

डोणगाव (बुलढाणा अपडेट / सुबोध आखाडे) :– बुद्धिमत्ता व स्मरणशक्तीच्या जोरावर अवघ्या २ वर्षे ८ महिने वयात डोणगावच्या चिमुकल्याने देशपातळीवर जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे.

चि. क्षितिज विशाल बाजड या बालप्रतिभेने जगातील तब्बल ७२ देशांच्या राजधानींची नावे केवळ २ मिनिटे ३० सेकंदांत सांगून आपले नाव थेट ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.

क्षितिजची आई सौ. सोनाली बाजड व वडील विशाल बाजड यांनी त्याच्यातील हुशारपणा अगदी लहान वयात ओळखला. खेळाच्या वयातही रटाळ अभ्यास न लावता, रंजक पद्धतीने माहिती देत त्याला शिकवण्याचा निर्णय घेतला. आई-वडिलांच्या योग्य मार्गदर्शनामुळे क्षितिजने काही दिवसांतच हा कठीण टप्पा यशस्वीरित्या पार केला.

या यशामुळे डोणगावसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.

सोशल मीडियावर क्षितिजच्या यशाचे व्हिडीओ व्हायरल होत असून, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

त्याच्या अफाट बुद्धिमत्तेमुळे अनेकजण क्षितिजला आजच ‘भविष्यातील गुगल बॉय’ म्हणू लागले आहेत. ज्या वयात मुले नीट बोलूही शकत नाहीत, त्या वयात जगाचा नकाशा आणि विविध देशांच्या राजधानी त्याच्या तोंडपाठ असणे हे सर्वांसाठी आश्चर्यकारक ठरत आहे.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून क्षितिजला अधिकृत प्रमाणपत्र, मेडल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.

क्षितिजच्या या विलक्षण प्रतिभेमुळे त्याचे उज्ज्वल भविष्य निश्चित असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Related Articles

जन्मदिनी बॅनरबाजीला फाटा, जनहिताला प्राधान्य! — मा.कृषी सभापती राजेंद्र पळसकर यांचा समाजाला आदर्श संदेश

डोणगाव येथे दोन दिवसीय निशुल्क आरोग्य चाचणी शिबिराचे आयोजन करून सर्वसामान्य जनतेसाठी मोठा दिलासा देण्यात आला. या शिबिरात सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या, आवश्यक औषधोपचार,...

जिल्हाधिकाऱ्याकडे पांदण रस्त्याची मागणी – शैलेश सुबोध सावजी

डोणगाव , परिसरातील डोणगाव–शेलगाव रस्त्याच्या उर्वरित तीन किलोमीटर कामाला मुख्यमंत्री बळीराजा पांढण रस्ता योजनेअंतर्गत तातडीने मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी मागणी बुलढाणा...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!