https://chat.whatsapp.com/KNTitp15G8M2BgVDPl32Aw?mode=wwtडोणगाव परिसरात पांढऱ्या तांदळाच्या काळाबाजाराने अक्षरशः उच्छाद मांडला असून भर दिवसा तांदळाच्या गाड्या खुले आम फिरताना दिसत आहेत. शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेकडून चिल्लर भावात तांदूळ उचलून पुढे बेभाव विक्री करणाऱ्या तांदूळ माफियांचे सुळसुळाट झाला आहे. गावात उघड उघड सुरू असलेल्या या गैरव्यवहाराकडे पुरवठा विभाग आणि पोलिस यांचे डोळे का बंद आहेत? हा इतका मोठा काळाबाजार नजरेआड कसा राहतो? आणि यामागे कोणाचे हात आहे अशी चर्चा रंगत आहे? असे तिखट प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये जोरदार गाजत आहेत. गरीबांच्या हक्काचे अन्न काळ्या बाजारात पोहोचत असताना संबंधित यंत्रणा निष्काळजीपणा का दाखवत आहे, याबाबत जनतेत प्रचंड संताप पसरला आहे. प्रशासनाने तात्काळ हालचाल करून या तांदूळ माफियांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जन आक्रोश उफाळण्याची पूर्ण शक्यता असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.





